मुंबई | आज सर्वत्र पुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत असल्याचं पहायला मिळत आहे. राजकीय नेतेही नागरिकांसोबत संवाद साधत त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देत असल्याचं पहायला मिळत आहे.
अशातच आता भाजप खासदार गिरीश बापट यांनी राज्यातील नागरिकांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज पहिल्यांदाच पुणे सोडून दिल्लीमध्ये पाडवा साजरा करत असल्याचं बापट यांनी सांगितलं.
आज खूप आनंदाचा क्षण आहे. सध्या देशाची परिस्थिती, आता देशातील महागाई, कोरोना संकट या सगळ्या पीडा निघून जावोत, असा गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी एक संकल्पही केला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जगाचे नेतृत्व करणाऱ्या भारत देशाची पुन्हा गती होवो. ही स्फूर्ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने येते, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
गुढी उभारणे म्हणजे संकल्प उभारणं असतं. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील अंतर प्रयत्नाने पूर्ण करायचं असतात, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी नागरिकांना दिला आहे.
दरम्यान, केंद्रात भाजपची सत्ता असताना देखील गिरीश बापट यांनी महागाईचा उल्लेख केल्याने आता राजकीय वर्तुळात सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“उसाची शेती वाढल्यानं मला काळजी वाटतेय”
“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”
‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव, म्हणाले…
Petrol Diesel Prices Today | आज पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल-डिझेल महागलं
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या- सुप्रिया सुळे