“उसाची शेती वाढल्यानं मला काळजी वाटतेय”

सांगली | उसाची शेती इतकी वाढली आहे की, मला याची काळजी वाटते. जवळपास मे अखेरपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील असं दिसतंय.पाणी दिसलं की आपण ऊस लावतो, पण आता नवीन विचार करावा लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेत.

आज शिराळा येथे भाजप नेते, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

आज शिवाजीराव नाईक पुन्हा घरी परतत आहेत, त्याचा मला आनंद आहे. शिवाजीराव नाईक यांच्या कामाचा राज्यातील सर्व भागात उपयोग करून घेतला पाहिजे. या भागातील जवळपास सर्व प्रश्न सुटत आलेले दिसत आहेत, याचा आनंद आहे, असं ते म्हणालेत. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

आजच्या दिवशी आनंदाची गुढी उभा करून आपण सगळे इथे आलात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभारलेली विकासाची गुढी भक्कम करण्यासाठी आपण आलात. योग्य असेल तर पाठींबा द्यायला आणि योग्य नसेल तर वेगळी भूमिका घ्यायला हा भाग कधी मागे पडला नाही, असं ते म्हणालेत.

स्वातंत्र्य लढ्यात या भागाचं खूप मोठं योगदान आहे. शिवाजीराव हे यशस्वी जि.प अध्यक्ष होते, राज्यात ते अग्रभागी असत. शेती, उद्योग अशा विविध विभागात त्यांनी काम केलं आहे, असं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, आज देशाचं राजकारण वेगळ्या दिशेनं जातंय. मात्र, हे राज्य वेगळा विचार करणाऱ्यांच्या हातात आहे. धर्माच्या नावाने देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं” 

‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं ‘हे’ नाव, म्हणाले… 

Petrol Diesel Prices Today | आज पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल-डिझेल महागलं 

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या- सुप्रिया सुळे 

सर्वात मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू