मुंबई | जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो, असं म्हणत शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील विरोधकांवर निशाणा साधला आहे.
गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी विरोधकांवर सडकून टीका केलीय. जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.
नामर्दांना जिथे स्थान नाही अशी शिवसेना संघटना आहे. शिवसेना प्रमुखांच्या आदेशानेच शिवसैनिक काम करतात. पापी लोकांची कंबर आम्ही मोडली. आता काही जण शिवसेना संपवायला निघाली आहेत. त्यांना एवढचं सांगतो शिवसेनेला तुम्ही संपवू शकत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसेनेचा जो शाखा प्रमुख तुरुंगात गेला नाही, तो शिवसैनिक नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी पाठीचा कणा आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! पोलीस स्टेशनबाहेर केतकी चितळेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक
मोठी बातमी! केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…
“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…”