“मलाही वाटतं की उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावं”

मुंबई | काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानीला पक्षाचा मुख्यमंत्री व्हावं, असं साकडं घातलं होतं. तर आज सातारा येथील एका कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य केलं आहे. यावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावं अशी आपली इच्छा असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री आपलाच असेल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे हे शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात आले आहे होते. यावेळी ते बोलत होते.

आज शब्द देतो सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा मंत्री म्हणून येणाऱ्या काळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रिपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील ते आपलेच असतील, असं मुंडे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही” 

केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा! 

“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही” 

’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!