“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरूवात झाली”

नवी दिल्ली | केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एका कार्यक्रात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

पंतप्रधान मोदी 2014 साली सत्तेवर आले. तेव्हापासूनच विकास कामांना सुरूवात झाली असल्याचं हरदीप सिंग पुरी म्हणाले आहे.

केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत ज्यांनी सामान्य माणसांच्या जीवनात क्रांती आणली, असं वक्तव्यही पुरी यांनी केलं आहे. ‘TV9 न्यूज नेटवर्क’च्या एका कार्यक्रमात बोलताना हरदीप सिंग पुरी यांनी केंद्राच्या विविध योजनांची देखील माहिती दिली.

आयुष्मान भारत, फेरीवाल्यांसाठी दहा हजारांचे कर्ज देण्याची योजना यासारख्या अनेक चांगल्या योजना केंद्र सरकारने जनतेच्या भल्यासाठी राबवल्या असल्याचं पुरी म्हणाले.

केंद्राने नव्याने आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. यावर देखील हरदीप सिंग पुरी यांनी भाष्य केलं आहे.

विरोधक अग्निपथ योजनेबाबत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप पुरी यांनी केला आहे. तसेच कृषी कायद्यांप्रमाणे आत्ताही संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचं पुरी म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्राच्या योजनांबद्दल माहिती देताना पुरी यांनी पंतप्रधान मोदींचं भरभरून कौतुक केलं. मोदी सत्तेत आल्यापासूनच विकास कामांना सुरूवात झाली असल्याचं देखील हरदीप सिंग पुरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

अग्निपथ योजनेवरून संजय राऊत मोदी सरकारवर बरसले, म्हणाले…

बिचुकलेंचं एकच लक्ष, आता राष्ट्रपतीपद फक्त; लवकरच उमेदवारी अर्ज भरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं शंभरीत पदार्पण; मोदींनी पाय धुवून आशीर्वाद घेतले

सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणाऱ्या हॉटेलवाल्याबाबत राजू शेट्टींचा मोठा खुलासा, म्हणाले…

मोठी बातमी! वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आमदारांना नातेवाईक, मित्रांसोबतदेखील न बोलण्याचा आदेश