‘हे बदल म्हणजे आभाळाला ठिगळ लावल्यासारखं’, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

मुंबई | केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर भारतात या योजनेविरोधात संताप व्यक्त केला जात असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

युवकांचा वाढता विरोध बघता केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. अग्निपथ योजनेला होणारा विरोध शांत करण्यासाठी केंद्र सरकार रोज नव्या घोषणा आणि योजनेत बदल करत असल्याची टीका रोहित पवारांनी केली.

अग्निवीरांसाठी CAPF आणि आसाम रायफल्समध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यावरून देखील रोहित पवारांनी टीका केली आहे.

योजनेत गुंतागुंत आणि अस्पष्टता असल्याचं देखील रोहित पवार म्हणाले. केंद्र सरकारकडून योजनेत रोज केले जाणारे नवीन बदल म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्यासारखं आहे, अशी खोचक टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे.

केंद्र सरकारने आपला ego बाजूला ठेवून तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य मार्ग काढायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही, असा सल्ला देखील रोहित पवार यांनी दिला आहे.

एकाच दिवसात योजनेत बदल करावा लागतो. याचाच अर्थ योजना तयार करताना विस्तृत विचार झालेला नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.

दरम्यान, केंद्राच्या अग्निपथ योजनेवर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरूवात झाली”

अग्निपथ योजनेवरून संजय राऊत मोदी सरकारवर बरसले, म्हणाले

बिचुकलेंचं एकच लक्ष, आता राष्ट्रपतीपद फक्त; लवकरच उमेदवारी अर्ज भरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं शंभरीत पदार्पण; मोदींनी पाय धुवून आशीर्वाद घेतले

सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणाऱ्या हॉटेलवाल्याबाबत राजू शेट्टींचा मोठा खुलासा, म्हणाले…