मुंबई | मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे. मी कोणतीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही, असं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले आणि हाती कमळ हाती घेतलेले दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये भाजपात हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा आदि मान्यवर उपस्थित होते.
आमच्यासारख्या तत्त्वाने वागणाऱ्या माणसांसाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे. आज जास्त बोलणार नाही. जे बोलायचं ते इंदापूरच्या सभेत बोललो आहे. राजकारणात आम्ही तत्व निष्ठा पाळली, प्रामाणिकपणे काम केलं. परंतू कायमच आमच्यावर अन्याय झाला. परंतू याच अन्यायाविरूद्ध आता लढायचं आहे, असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं.
मुख्यमंत्र्यांनी हसऱ्या चेहऱ्याने पाच वर्ष काम केलं. आता हर्षवर्धन आला आहे. आणि केंद्रातील मोदी सरकारने देखील उत्तम काम केलं आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, पक्षाने माझ्यावर कोणतीही जबाबदारी टाकावी. ती जबाबदारी मी निष्ठेने पार पाडील, असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
महत्वाच्या बातम्या-
अन्यायाविरोधात लढायचं म्हणत काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांनी घेतलं ‘कमळ’ हाती! https://t.co/kdh0IsOb4q@Harshvardhanji @BJP4Maharashtra @INCMaharashtra @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
राज ठाकरेंबद्दल अजित पवारांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणतात…- https://t.co/632oYD9W6H #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
हर्षवर्धन पाटील आगीतून फुफाट्यात; इंदापूरच्या जागेवर शिवसेनेचा दावा! https://t.co/6GYH3s0Wcb @Harshvardhanji @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019