वाढदिवशीच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप करणार???

पुणे | काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आज वाढदिवस. मात्र आज वाढदिवशीच ते राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. नुकत्याच त्यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थित पार पडला आणि तिथेच माशी शिंकल्याचं बोललं जातंय. त्यांचा भाजपप्रवेश नक्की झाल्याच्या चर्चा आहेत..इंदापुरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा पेच आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीसाठी अजित पवार आग्रही असल्याची माहिती आहे. काँग्रेसला राष्ट्रवादी ही जागा सोडणार की नाही, हेच आणखी नक्की नाही. यामुळेच हर्षवर्धन पाटील नाराज आहेत.

2014 च्या विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळी चूल मांडली. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. आता 2019 च्या निवडणुकीला सामोेरे जाताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सध्या तरी एकत्र लढणार, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इंदापुरच्या जागेवर नक्की राष्ट्रवादीचा की काँग्रेसचा उमेदवार असणार?? या पेचामुळे हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय.

लोकसभा निवडणुकीत भाजपला घसघशीत यश मिळालं. त्यानंतर आघाडीतल्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजप शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. एकामागोमाग एक प्रवेश होत राहिले. हर्षवर्धन पाटीलसुद्धा काँग्रेसचा ‘हात’ झिडकारून भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भरणेंना देखील राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. आघाडीपुढे इंदापुरच्या जागेवरून मोठा पेच निर्माण झालाय.

दरम्यान, भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चांवर हर्षवर्धन पाटील यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-असा असेल उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा विस्तार!

-राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले; म्हणतात…

-…म्हणून आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणतात- धनंजय मुंडे

-अभिनंदन यांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा

-राष्ट्रवादीला मोठं खिंडार; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???