हर्षवर्धन पाटलांचं ठरलं? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट मात्र पक्षप्रवेश लेट???

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केल्यानंतर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

इंदापूरमध्ये झालेल्या सभेनंतर काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कॉल नॉट रिचेबल लागत होता. त्यानंतर आज हर्षवर्धन पाटील हे थेट मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीसंदर्भातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये सामील होतील, का अपक्ष म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवतील या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी चर्चा झाल्याचं कळालं आहे.

इंदापुरची जागा राष्ट्रवादी सोडायला तयार नाही. यावरुन हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

आमचा सिटिंग आमदार असल्याने आम्ही ही जागा सोडणार नाही, अशी राष्ट्रवादीची पडद्यामागची भूमिका आहे. त्यावरुन हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये मेळावा घेत राष्ट्रवादीला धारेवर धरलं होतं.

महत्वाच्या बातम्या-