अहमदनगर | इतर देशांच्या तुलनेत भारतात कोविड लवकर नियंत्रणात आला असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन सांगतात. त्यांच्याच पक्षाचे महाराष्ट्रातील नेते मात्र वेगळं बोलतात. मग नक्की खोटं कोण बोलतंय? नरेंद्र मोदी, हर्षवर्धन की फडणवीस, असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय.
अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
सरकार अडचणीत यावं यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर ही मंडळी देव पाण्यात घालून बसली आहेत, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत त्याचं फडणवीस, दरेकर यांना वाईट वाटत आहे. हे चुकीचं आहे, असंही मुश्रीफ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-‘उद्धव ठाकरे दाढी कुठं करतात?, केस कुठं कापतात?’; ‘या’ भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला
-“मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री अन् शरद पवारांना दौरा करावा लागला”
-‘हे तर पवारांनी मान्य केलं’; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
-पुण्यात रस्त्यावर पचकन थुंकला… अशी कारवाई झाली की त्याला चांगलीच अद्दल घडली!
-दिलासादायक! गेल्या 48 तासांत एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही