लग्नास नकार दिल्यानं भाच्यानं मामाच्या पोरीला पळवलं, उसाच्या फडात रंगला पकडापकडीचा खेळ

पंढरपूर | सख्या मामाच्या अल्पवयीन मुलीला लग्नासाठी मागणी घातली, मात्र मामाने लग्नासाठी नकार दिला. मुलीनंही लग्नास नकार दिला होता. मात्र मामाच्या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या भाच्याने मात्र थेट मुलीचं अपहरण केलं आणि एका नातेवाईकाच्या उसाच्या फडात तिला लपवलं. त्यानंतर याच शेतात पोलिसांनी या भाच्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नाही. मात्र पोलिसांनी अखेर मोठ्या शिताफीने त्याला माळशिरसमधून ताब्यात घेतलं.

तानाजी मधुकर शेंबडे, अभिजित मधुकर शेंबडे  (दोघे भाऊ रा. माळशिरस) व त्यांना मदत करणारे त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्‍वर पांडुरंग गोफणे (रा. महादेववाडी) व विकास चोपडे (रा.कव्हे, ता. माढा) या चौघांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी विकास फरार आहे.

girl

नक्की काय आहे हा प्रकार?-

माळशिरस येथील तानाजी शेंबडे याचं लव्हे येथे राहणाऱ्या आपल्या मामाच्या मुलीवर प्रेम होतं. मामाची मुलगी अल्पवयीन आहे, मात्र तानाजीने तिच्यामागे व मामामागे लग्नाचा तगादा लावला होता. मामाचा तसेच मुलीचा या लग्नाला विरोध होता. मात्र तानाजी त्यांच्या मागेच लागला होता. अखेर मामाने आपल्या मुलीचं लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला आणि तिच्यासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. तानाजीला ही गोष्ट कळताच त्यानेही मामाच्या मुलीसोबत लग्न करण्याचा चंग बांधला.

मुलीचं अपहरण करण्याची योजना-

मामा आपल्या मुलीला स्थळ पाहण्यासाठी माढा तालुक्यातील एका गावाला गेल्याची कुणकुण माळशिरस येथील तानाजीला लागला. याच काळात मुलीचं अपहरण करण्याचं तानाजीनं ठरवलं. त्याने आपला भाऊ अभिजीतला सोबत घेतलं आणि दोघे कुर्डुवाडीला आले. मुलीचं अपहरण करण्यासाठी आपला महादेववाडी येथील नातेवाईक ज्ञानेश्वर गोफणे यांना गाडी भाड्यानं घेऊन येण्यास सांगितलं. त्यांनी कव्हे येथील विकास चोपडे याची चारचाकी गाडी भाड्याने आणली.

Girl 1

कसं केलं मुलीचं अपहरण?-

भाड्यानं घेतलेल्या चारचाकी गाडीतून चौघे लव्हे येथील मामाच्या वस्तीवर गेले. घरी पीडित मुलगी व तिचा लहान भाऊ दोघेच होते. तानाजीने मामाच्या लहान मुलाला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर आणायला सांगितलं. मुलगा चार्जर आणण्यासाठी आतल्या खोलीत गेल्याबरोबर त्याने दाराला बाहेरून कडी लावली. तानाजी व अभिजित यांनी मामाच्या मुलीला गाडीत बसण्यास सांगितलं, मात्र तीने गाडीत बसण्यास नकार देताच दोघांनी तिला ओढत गाडीत आणून बसवलं.

शेजाऱ्याने वाचवण्याचा केला प्रयत्न मात्र…-

तानाजी आणि अभिजीत जेव्हा पीडित मुलीला गाडीत बसण्याची जबरदस्ती करत होते, तेव्हा मुलीनं आरडाओरडा केला. हा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतात काम करणारा एका व्यक्‍तीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याला ढकलून खाली पाडलं आणि मुलीला गाडीत टाकून ते पसार झाले.

Girl 2

पोलिसांसोबत शिवनापाण्याचा खेळ-

मुलीचं अपहरण होताच यासंदर्भात कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. यानंतर पोलिसांचं एक पथक माळशिरस येथे गेलं, त्यांनी मुलाच्या आई-वडील तसेच इतर नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर हे पथक टेंभुर्णी येथे आलं. बेंबळी येथे तानाजीच्या एका नातेवाईकाकडे तानाजी लपल्याची पोलिसांना शंका होती.

पोलिसांनी या नातेवाईकाकडे तानाजीची चौकशी केली, मात्र इथंही त्याचा शोध लागला नाही. अपहरणकर्त्यांनी मुलीला उसाच्या शेतात मध्यभागी नेऊन ठेवलं होतं, मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस देखील उसाच्या शेतात पोहोचले, मात्र अपहरणकर्त्यांनी मुलीचं तोंड दाबून तिला उसात दडवून ठेवलं. अखेर पोलिसांना इथंही ते सापडले नाहीत.

नातेवाईकाला दिलेल्या दमाचा झाला परिणाम-

बेंबळे येथील नातेवाईकाचं घर सोडण्यापूर्वी पोलिसांनी या नातेवाईकाला दम दिला होता. त्याचा योग्य तो परिणाम झाला, पोलीस निघून जाताच त्या तक्रारदाराने पळवून आणलेल्या मुलीला येथून घेऊन जा, असं अपहरणकर्त्यांना सांगितलं. त्यामुळे तानाजी पहाटेच त्या मुलीला घेऊन माळशिरसला आला. माळशिरसमध्ये पोलिसांनी आपले खबरे तैनात केलेलेच होते. तानाजी आल्याची खबर मिळताच पोलिसांनी पीडित मुलीसह अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं.

महत्वाच्या बातम्या-

-“नक्की खोटं कोण बोलतंय, नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस?”

-‘उद्धव ठाकरे दाढी कुठं करतात?, केस कुठं कापतात?’; ‘या’ भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

-“मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री अन् शरद पवारांना दौरा करावा लागला”

-‘हे तर पवारांनी मान्य केलं’; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

-पुण्यात रस्त्यावर पचकन थुंकला… अशी कारवाई झाली की त्याला चांगलीच अद्दल घडली!