“राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष सुरु झाला”

औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आजच्या सभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून मैदान पूर्णपणे भरलं आहे.

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेला सुरुवात झाली आहे. प्रचंड अशी गर्दी या सभेला पहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांनी भर सभेत शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार म्हणतात, मी दुही माजवतोय. पवार साहेब तुम्ही जाती जाती भेद केला ना त्याने दुही माजलीये, असं राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार नास्तिक आहेत म्हटलं तर त्यांना झोंबल. तुमची कन्या लोकसभेत म्हटलीये माझे वडील नास्तिक आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.

शरद पवारांसाठी काही संदर्भ आणले आहेत. प्रबोधनकारांचे संदर्भ राज ठाकरे यांनी सभेत वाचून दाखवलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष सुरु झाला.

शरद पवारांनी वृद्धापकाळात बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास देण्यास सुरुवात केली. कारण बाबासाहेब पुरंदरे ब्राम्हण होेते.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवारांना अनेक मुद्द्यांनी घेरलेलं पहायला मिळालं आणि टीकांची झोड सुरुच आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “कोणी गोंधळ करायला आलं असेल तर तिथंच हाणा”; राज ठाकरे भर सभेत भडकले

  “मशिदींवरील भोंगे काढायला सांगितलं तर यांची हातभर फाटली आणि सांगतात….”

  “काही लोकांना वाटतं ते म्हणजेच महाराष्ट्र आहे”

  “भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी सहा तास नमाज करेल”

  “फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये”