‘मास्क घालून सेक्स करा’; या सरकारचा जोडप्यांना अजब आदेश

नवी दिल्ली | जगभरात कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पहायला मिळतंय. अनेक ठिकाणी कोरोनाची पाचवी लाट आल्याचं दिसतंय.

आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करणारा हा दिवस सर्वांसाठी खास असतो. मागील दोन वर्षात कोरोनामुळे अनेकांना हा दिवस साजरा करता आला नव्हता.

आता कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनेकांना आपल्या भावना व्यक्त करता येत आहेत. थायलंडमध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातोय.

थायलंडमधील बँग राॅक हा जिल्हा प्रेमीयुगुलांसाठी महत्त्वाचा मानला जातो. अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. अशातच आता थायलंडमधील एका निर्णयाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

थायलंडमधील कोरोना रूग्णसंख्या मागील काही दिवसांपासून वाढत असल्याचं दिसतंय. मागील काही दिवसांमध्ये रूग्णसंख्या अनेकपटींनी वाढतीये.

अशातच आता थायलंडच्या आरोग्य विभागाने अजब आदेश काढले आहेत. सेक्स करताना मास्क घालून सेक्स करा, असा सुचना करण्यात आल्या आहेत. लौगिंक संबंधातून जरी संक्रमण होत नसलं तरी चुंबनच्या माध्यमातून संक्रमण होऊ शकतं, असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

सेक्स करताना चेहरा समोरासमोर येऊ नये, याची काळजी घ्यावी, असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. तसेच गर्भनिरोधकाचा वापर करावा, अशा सुचना देखील दिल्या आहेत.

दरम्यान, या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. कोरोना संक्रमण आणखी पसरू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं देखील सरकारने यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका

“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”