हवेत उडणारी कासवं तुम्ही पाहिलीत का? नक्की पाहा हा दुर्मिळ व्हिडिओ

मुंबई | कासव म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं ते पाण्यात पोहणारं आणि जमिनीवर अगदी हळूवारपणे लुटूपुटू धिम्या गतीने चालणारा प्राणी. मात्र, हाच संथ गतीने चालणारा कासव हवेत उडतो, असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना? पण हे खरं आहे.

सध्या सोशल मिडीयावर हवेत उडणाऱ्या कासवांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ज्याला साधं जमिनीवर चालता येत नाही ते कासव हवेत उडू लागल्यानं या व्हिडिओवर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. हवेत उडणाऱ्या या कासवांचा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे.

सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, छोटे छोटे काजव्याप्रमाणे असणारे हे कासव एका व्यक्तीच्या हातावर बसले आहेत. या कासवांचा कलर सोनेरी आहे. हे कासव पाहून जणू ते सोन्याचेच आहेत, असा भास होत आहे.

हे पिटुकले कासव हळूहळू त्या व्यक्तीच्या हातावरुन उडून जात आहेत. काजवे जसे हवेत उडतात तसेच हे कासव देखील हवेत उडताना दिसत आहेत. या उडणाऱ्या कासवांनी अनेकांना आश्चर्यतकीत करुन सोडलं आहे.

सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये याबद्दल काही माहिती देखील दिली आहे. ते या व्हिडिओवर कॅप्शन देत म्हाणाले आहेत की, अनेकदा चमकतं ते सोनंच असतं. हे बीटल्स दक्षिण पूर्व आशियात सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

तिने नवऱ्याला खुर्चीला बांधलं, पॉ.र्न व्हिडिओ दाखवले अन् पुढे जे केलं त्याने महाराष्ट्र हा.दरला!

कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांनी कसं पकडलं? संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद; पाहा व्हिडिओ

ग्राहकांसाठी खुशखबर! सहा महिन्यांत सोनं तब्बल 22 टक्क्यांनी घसरलं; वाचा आजचे दर

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार? मुख्यमंत्री म्हणाले…

डेलकर प्रकरणाला धक्कादायक वळण! ‘या’ व्यक्तीने डेलकरांकडे 25 कोटींंची खंडणी मागितली