‘आता चाय पे चर्चा होऊनच जाऊद्यात’; नाईक कुटुंबियांचं भाजपला खुलं आव्हान

मुंबई | अन्वय नाईक प्रकरणावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीशी जमिनीचा व्यवहार केला होता. या प्रकरणाचा संदर्भ रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अ.टकेशी जोडत विरोधक सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टिका करत आहेत.

याबद्दल आज अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना पत्रकारांनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. यावेळी नाईक यांच्या कुटुंबियांनी भाजप नेत्यांना खुलं आव्हान केलं आहे. तसेच नाईक कुटुंबियांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील यावेळी चांगलंच धारेवर धरलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना नाईक कुटुंबीय म्हणाले की, सातबाऱ्याचाच मुद्दा असेल तर सर्व बड्या नेत्यांनी त्यांचे सातबारे काढावेत. आम्ही आमच्या बॅंक खात्यांची माहीती देतो. आता चाय पे चर्चा होऊनच जाऊद्यात. रश्मी ठाकरे आणि आमच्यात झालेला जमिनीचा व्यवहार का.यदेशीर पद्धतीने करण्यात आला होता.

अन्वय नाईक हे एक आर्किटेक्ट होते. जमिनीचे व्यवहार करणे हा त्यांचा व्यवसाय होता. जमिनीची खरेदी विक्री करणे गु.न्हा आहे का? त्यातही भाजप नेते मुद्दाम आठ दहा वर्षांपुर्वीचं प्रकरण उकरुण काढत आहेत. ही बाब कितपत योग्य आहे, असा सवाल नाईक यांच्या कुटुंबियांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर या प्रकरणावरुन गंभीर आ.रोप केले होते.  रश्मी ठाकरे यांच्यासोबतच सोमय्या यांनी मनीषा रवींद्र वायकर यांच्यावरही आ.रोप केले होते. यासंबंधित त्यांनी एक ट्वीट केलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक यांच्या परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध आहेत. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई येथून अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे तुम्ही यासाठी अर्णव गोस्वामी यांना लक्ष करत आहात का?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत विचारला होता.

तसेच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत जमिनीची काही कागदपत्रे देखील पोस्ट केली होती. या ट्वीटमध्ये त्यांनी रश्मी ठाकरे यांनी जी जमीन नाईक यांच्याकडून घेतली आहे. त्या जमिनीचा सात बारा देखाल पोस्ट केला होता. पुढे हाच मुद्दा उचलून धरत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं होतं. नुकतंच विधानसभेत देखील हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता.

महत्वाच्या बातम्या –

हवेत उडणारी कासवं तुम्ही पाहिलीत का? नक्की पाहा हा दुर्मिळ व्हिडिओ

तिने नवऱ्याला खुर्चीला बांधलं, पॉ.र्न व्हिडिओ दाखवले अन् पुढे जे केलं त्याने महाराष्ट्र हा.दरला!

कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांनी कसं पकडलं? संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद; पाहा व्हिडिओ

ग्राहकांसाठी खुशखबर! सहा महिन्यांत सोनं तब्बल 22 टक्क्यांनी घसरलं; वाचा आजचे दर

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार? मुख्यमंत्री म्हणाले…