रणवीर आणि आलियाचा कीस करतानाचा ‘तो’ फोटो व्हायरल

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक जोडप्यांनी ऑनस्क्रीन बरोबरच ऑफस्क्रीन देखील प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पडद्यामागे देखील प्रेक्षकांना आवडणाऱ्या जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे अभिनेता रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं.

या दोघांना नेहमीच प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत असतं. आलिया सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या पोस्ट्स टाकत असते. आलियाच्या या पोस्टसवरुन तिचं रणवीरवर असलेलं प्रेम स्पष्टपणे जाणवतं.

अशातच आलिया आणि रणवीरचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये आलिया आणि रणवीर दोघे कीस करताना दिसत आहेत. यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा चालू झाल्या आहेत.

हा फोटो आलिया भट्टची स्टायलिस्ट लक्ष्मी लहरच्या एका पोस्टमधूम समोर आला आहे. लक्ष्मी लहरने इन्स्टाग्रामवर आलिया भट्टचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलियाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. परंतु नेटकऱ्यांचं लक्ष आलियावर नव्हे तर तिच्या पाठीमागे टांगलेल्या एका फोटोवर गेलं आहे.

लक्ष्मीने शेअर केलेल्या आलियाच्या फोटोमध्ये तिच्या मागे दोन फोटो टांगलेले दिसत आहेत. या फोटोतील एका फोटोमध्ये रणवीर आलियाला कीस करताना दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत.

या फोटोमध्ये आलिया आणि रणवीर एका पायरीवर बसलेले दिसत आहेत. ज्यामध्ये रणवीर आलियाच्या डोक्यावर कीस करत आहे. या फोटोमधून रणवीरला आलियाबद्दल असलेली काळजी दिसत आहे. यामुळे हा फोटो नेटकऱ्यांना चांगलाच आवडत आहे.

दरम्यान, आलिया आणि रणवीरचा हा फोटो रनथोम्बर नॅशनल पार्क येथील आहे. हे दोघे नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. यावेळी हा फोटो काढण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/CSvjV06KwDU/

महत्वाच्या बातम्या-

नवरदेवाला पाहताच नवरी मंडप सोडून रस्त्यावर पळाली अन्…; पाहा व्हिडीओ

‘डिंपल लग्न करणार नाही तिला विक्रमच्या..’; शेरशाह विक्रम बत्रांच्या वडिलांचा खुलासा

“अर्जुनला इतकी मेहनत करताना पाहून वाटतं की सैफला सोडून त्याच्याशी लग्न करावं”

“सोशल मीडियावर नुसत्या फुलाचा फोटो शेअर केला तरी त्याला हस्तमैथुन…”

‘या’ बड्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल, महिला रायटरची केली फसवणूक?