नवरदेवाला पाहताच नवरी मंडप सोडून रस्त्यावर पळाली अन्…; पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला चांगली शिकवण देवून जातात तर काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक आपलं मनोरंजन करणारा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहणार नाही. लग्न म्हटलं की मजा मस्ती आलीच. लग्नचा क्षण हा नवरा नवरीसाठी अमूल्य असतो. यामुळे या क्षणाचा प्रत्येकच जोडपं मनमुरादपणे आनंद लुटताना दिसते.

सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये देखील एक नवरी आपल्या लग्नाचा मनमुरादपणे आनंद लुटताना दिसत आहे. नवरदेव आलेला पाहताच ही नवरी मंडप सोडून रस्त्यावर पळत येते. तिला नवरदेवाला पाहून इतका आनंद होतो की, ती नवरदेवासमोरच डान्स करायला सुरुवात करते. नवरीचे हे रूप पाहून नवरदेव देखील तिच्याकडे पाहतच राहतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवरदेव वऱ्हाडी मंडळींसह लग्नस्थळी पोहोचला आहे. नवरदेव आलेला पाहून नवरी त्याच्या स्वागतासाठी स्वतः मंडपातून बाहेर आली आहे. नवरदेव आपल्या गाडीतून खाली उतरताच नवरीने त्याच्यासमोर डान्स करण्यास सुरुवात केली आहे.

यावेळी नवरी अगदी बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे. सभोवताली असणारी वऱ्हाडी मंडळी देखील नवरीला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत आहेत. नवरदेवाला देखील हे अनोखं स्वागत आवडलेलं आहे.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजू शकलं नाही. मात्र, नेटकऱ्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडलेला दिसत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

दरम्यान, आयएएस अधिकारी पी नरहरी यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. एक नवरी नवरदेवासाठी नाचत आहे. त्याला आपल्या आयुष्यात मिळवून ती खूप आंनदी आहे, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओवर दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘डिंपल लग्न करणार नाही तिला विक्रमच्या..’; शेरशाह विक्रम बत्रांच्या वडिलांचा खुलासा

“अर्जुनला इतकी मेहनत करताना पाहून वाटतं की सैफला सोडून त्याच्याशी लग्न करावं”

“सोशल मीडियावर नुसत्या फुलाचा फोटो शेअर केला तरी त्याला हस्तमैथुन…”

‘या’ बड्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल, महिला रायटरची केली फसवणूक?

अभिषेकच्या ‘या’ गोष्टीवर आहे ऐश्वर्याचं प्रेम, म्हणूनच केलं बीग बींच्या मुलाशी लग्न