ऐकून आश्चर्य वाटेल पण ‘या’ पठठ्याने एका बॉलमध्ये काढले चक्क 7 रन, पाहा व्हिडीओ

मुंबई | न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टेस्टला आज (रविवार) सुरूवात झाली. या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा बॅटर विल यंग (Will Young) याने एका बॉलरवर चक्क 7 रन काढले आहेत.

न्यूझीलंडच्या इनिंगमधील 26 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बांगलादेशकडून इबादत हुसेन ती ओव्हर टाकत होता.तर विल यंग स्ट्राईकवर होता.

इबादतच्या ओव्हरचा शेवटचा बॉल विल यंगच्या बॅटला लागून सेकंड स्लिपच्या दिशेने गेले. त्यावेळी बांगलादेशच्या फिल्डरनं त्याचा कॅच सोडला. त्याचबरोबर त्याला बॉल अडवताही आला नाही.

बांगलादेशच्या फिल्डरने तो बॉल बाऊंड्री जवळ अडवला. तोपर्यंत यंगने पळत 3 रन काढले होते. त्यावेळी बॉलर एंडवर उभा असलेला नरूल हसनला थ्रो पकडता आला नाही.

त्यामुळे बॉल सरळ बाऊंड्रीवर गेला. या पद्धतीने ज्या बॉलवर यंग आऊट होऊ शकला असता त्यावर त्याला 7 रन मिळाले. यंग 26 रनवरून थेट 33 वर पोहचला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने शानदार फलंदाजी करताना कसोटी क्रिकेटमधील आपले 12वे शतक पूर्ण केलं.

लॅथमने 29 डावांनंतर कसोटीत शतक झळकावले. त्याने शेवटचे शतक 2029 मध्ये इंग्लंडविरुद्ध झळकावले होते. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 1 गडी गमावून 349 धावा.

लॅथम 186 आणि डेव्हन कॉनवे 99 धावांवर नाबाद आहे. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी झाली आहे.

पहिल्या कसोटीत संघाला बांगलादेशकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध बांगलादेशचा हा पहिला विजय ठरला.

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडसाठी दुसरी कसोटी ही करा किंवा मरो यापेक्षा कमी नाही. जर किवी संघ हा सामना हरला किंवा अनिर्णित राहिला तर BAN कसोटी मालिका ताब्यात घेईल.

 

महत्वाच्या बातम्या-

एसटी बसचा चक्काचूर!, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात 

बाहुबली फेम कट्टपालाही झाली कोरोनाची लागण, अभिनेते सत्यराज रूग्णालयात दाखल 

संसदेत कोरोनाचा उद्रेक, तब्बल ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

‘नो व्हॅक्सिन नो जॉब’; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

सावधान! Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये दिसतायेत ‘ही’ गंभीर लक्षणं