नवी दिल्ली | शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वादांवर आणि विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या घडामोडीकडे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पहिल्यांदा बाहेर पडलेल्या आणि बंडाचे निशाण फडकविणाऱ्या 16 आमदारांवर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांला शिंदे यांनी न्यायालयात आव्हान केले होते.
शिवसेनेवर कोणाचा हक्क राहणार, धनुष्यबाण कोणाचे, अपात्र आमदारांचे काय, अशा विविध यांचिंकावर आज सुनावणी होणार आहे. अपात्र आमदारांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा देखील समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरविले, तर राज्यातील सरकार कोसळणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू होणार असल्याची शक्यता असल्याचे वर्तविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाता (Supreme Court of India) सुनावणी सुरु आहे. काही चुकीचे घडत असल्याते निदर्शनास आल्यास न्यायालय कारवाई करेल. आणि त्यानुसार न्यायालय निर्णय घेईल, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
न्याय द्यायचा नसेल, तर तो लांबणीवर टाकणे हा दुसरा पर्याय आहे. त्यामुळे तो लांबणीवर टाकला जाऊ शकतो. आम्हाला देखील उत्सुक्ता आहे, या देशातील न्यायालय कसे वागते, असे जयंत पाटील म्हणाले.
आजच्या कारवाईवर देशातील जनतेचा न्यायाव्यवस्थेवर विश्वास राहणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे, असे देखील जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“2014 ला मला उपमुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण…”; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
नाना पटोले तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर संतापले; म्हणाले, “सावंतांची तत्काळ…”
“…तेव्हा मला मिळणारा पाठिंबा तुम्हाला कळेल”; शशी थरुर यांची स्पष्टोक्ती
‘नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका’