हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्याला धोक्याचा इशारा; पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक | हवामान खात्याने नाशिकला धोक्याचा इशारा दिला आहे, पुढचे 3 दिवस नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांनाही आवश्यक असल्यावरच बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.

गंगापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. गंगापूर प्रकल्पाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधून गोदावरी नदीमधे होळकर पुलाजवळ 7000 क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. पाऊसचा जोर पुढचे काही दिवस असाच रहाणार असल्याने गंगापूर धरणामधून आज दुपारपासून टप्याटप्याने विसर्ग वाढवला जात आहे.

गिरणा नदीकाठी असलेल्या गावांना इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे पुनद धरण, चनकापूर धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.

गिरणा नदीपात्रात सध्या 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यभरात पावसामुळे आत्तापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. यापैकी नऊ जणांचा मृत्यू गेल्या 24 तासांत झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही”; ‘या’ नेत्याचा मोदींना इशारा 

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; जिओकडून नव्या धमाकेदार प्लॅनची घोषणा 

‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला 

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी 

‘ती गोष्ट मला चार महिन्यांपूर्वीच समजली होती’; बंडखोर आमदारांबाबत माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट