शनिवार-रविवार फिरायला बाहेर पडताय?, पुणेकरांनो या गोष्टीमुळे वाढेल तुमची डोकेदुखी!

पुणे | पावसाळा सुरू झाल्याने अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडण्यास सज्ज होत आहेत. पुणे आणि परिसरात पावसाळी पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेता येईल अशी अनेक ठिकाणे आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात.  मात्र वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळतं.

पावसाळी पर्यटनासाठी पुण्यातून मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात. ताम्हिणी, देवकुंड, सिक्रेट पॉइंट, लोणावळा, खालापूर, अंधारबन, मुळशी, सिंहगड, पानशेत, भोर, वेल्हे, माणगाव अशा पुण्याजवळील ठिकाणांवर दरवर्षी मोठी गर्दी होते. या गर्दीला रोखण्यासाठी काही पर्यटन स्थळांवर जाण्यासाठीच बंदी घालण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी पोलिस तैनात आहेत.

लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर शहर पोलिसांची करडी नजर आहे. यासाठी शहर आणि परिसरात तीन ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहेत.

मुंबईवरून येताना खंडाळा येथे एक चेक पोस्ट तर पुण्यावरून येताना कुमार चौकात दुसरी चेक पोस्ट, भुशी डॅम आणि टायगर पॉईंटला सहारा ब्रिजवर देखील पोलिसांची करडी नजर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर असणार आहे.

शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांनी पर्यटनस्थळी येताना काळजी घ्यावी आणि शिस्त पाळावी, असं आवाहन, असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्याला धोक्याचा इशारा; पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज 

“माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही”; ‘या’ नेत्याचा मोदींना इशारा 

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; जिओकडून नव्या धमाकेदार प्लॅनची घोषणा 

‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला 

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी