येत्या 24 तासात मुसळधार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मुंबई | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ऐन दिवाळीत पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे.

मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला होता. त्यामुळे वातावरणात खूप बदल झालेले पहायला मिळाले. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. याचे परिणाम राज्यातील काही भागांवर दिसून येणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

ऐन दिवाळीत पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागकडून वर्तवण्यात येत आहे.

आज सकाळपासून काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, गेल्या 24 तासात मुंबईत 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातच मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जोरदार पावसाच्या हजेरीमुळे दिवाळी उत्साहावर पाणी फेरले आहे. तर भात कापणीसह झोडणीच्या तयारी असलेल्या बळीराजाची तारांबळ उडाली.

पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये शनिवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला.

विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडत असल्यानं नागरिकांनी आपली काळजी घ्यावी. जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “भाजपने सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचंही खासगीकरण केलंय”

 राकेश झुनझुनवाला यांनी सर्वांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

“तुमचा परफॉर्मन्स दाखवा, नाहीतर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं” 

भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट, ड्रग्ज प्रकरणात ट्विस्ट? 

…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ