पुढील 2 दिवस ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढत आहे. वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. विदर्भ आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला आहे. मात्र, वरूण राजा काही भागांमध्ये थंडावा देत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

येत्या 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र याठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

काही दिवसांपुर्वी कोकणातही उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळालं होतं. कोकणातील तापमानात अचानक वाढ झाली होती. अशातच दक्षिण कोकणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

देशात आसाम आणि मेघालय राज्यांमध्ये पावसासह गारपीठ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ होत आहे. नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत. त्यामुळे पावसाच्या सरी कोसळल्यास उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानात घट होणार आहे. मात्र, या काही दिवसांत नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

भोंग्याबाबत नारायण राणेंचं मोठं वक्तव्य म्हणाले…

“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे”