मोठी बातमी! लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताच्या लष्करप्रमुख पदी नियुक्ती

नवी दिल्ली | लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे नवे लष्करप्रमुख असणार आहेत. भारताचे सध्याचे लष्करप्रमुख एम.एम नरवणे हे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत असून त्यांच्या जागी मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करप्रमुख होणारे पहिले इंजिनिअर अधिकारी असणार आहेत. मनोज पांडे यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये जबाबदारी पार पाडली आहे.

39 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मनोज पांडे यांनी वेस्टर्न थिअटरमध्ये इंजिनीअर ब्रिगेड आणि नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माऊंटन डिव्हिजनचे नेतृत्व केले आहे.

ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी मनोज पांडे यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर इन चिफ ही जबाबदारी सांभाळली होती.

दरम्यान, पुढील सीडीएस कोण असणार याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे डिसेंबर महिन्यात एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधल झाले. त्यानंतर हे पद रिकामे आहे.

बिपिन रावत यांनी लष्कर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सीडीएस पज भूषविले होते. केंद्र सरकारी काही नावांवर विचार करत असून नाव अद्याप निश्चित केलेले नाही. परंतु, एम. एम.नरवणे यांचं नाव चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

भोंग्याबाबत नारायण राणेंचं मोठं वक्तव्य म्हणाले…

“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे”