“आमच्या कुटुंबावर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळे लोक….”

औरंगाबाद | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी लागोपाठ दोन सभा घेत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली होती.

शरद पवारांनीच राज्यात जातीवादाचं राजकारण केल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्यानंतर राज्यात मोेठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रत्येक संघटनेला बोलण्याचा हक्क आहे, त्यामुळं राज ठाकरेही बोलत आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या सभेवर मला जास्त काही बोलायचं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

आमच्या कुटुंबावर बोलणे ही मोठी बातमी असते त्यामुळं लोक बोलत असतात, असा टोला सुळे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. परिणामी दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या महागाई हा मुद्दा महत्त्वाचा आहे. परिणामी कोणाला कुठं जायचं ते जाऊद्या, इतर मुद्द्यांवर कोणाल काही बोलायचं ते बोलू द्या, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दिल्लीत उसळलेल्या दंगलीवर देखील सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दंगली होवू नयेत यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. दंगलीमुळं सर्वांचं नुकसान होतं, असंही सुळे म्हणाल्या.

शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला त्या घटनेवर देखील सुळेंनी आपलं मत मांडलं आहे. हल्ला करणाऱ्या महिलांना आपण भेटणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरूआहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 भोंग्याबाबत नारायण राणेंचं मोठं वक्तव्य म्हणाले…

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे” 

मोठी बातमी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!