मुंबई | येत्या 2 तारखेला गुडीपाडवा सण राज्यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी आता कोरोनावरील निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्वांना गुडीपाडवा उत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे.
राजकीय पटलावर देखील गु़डीपाडव्याची सर्वांना आतुरता असते. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्षांच्या सभा घेतात आणि पक्षाचे नेते या सभा दणाणून टाकत असल्याचं पहायला मिळतं.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेची सर्वांना आतुरता असते. मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली होती.
त्यावेळी त्यांनी राज्यातील चारही पक्षांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यावेळी हा फक्त ट्रेलर आहे. पिच्चर तो अभी बाकी है, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता गुडीपाडव्याला राज ठाकरे यांच्या भाषणाची सर्वांनाच आतुरता लागली आहे.
अशातच आता मनसेने राज ठाकरे यांच्या भाषणाआधी एक टिझर रिलीज केला आहे. यात वर्धापन दिनाच्या काही वाक्याची भर घातली आहे. पिच्चर आता 2 एप्रिलला शिवतिर्थावर होणार, असं राज ठाकरे यात म्हणताना दिसत आहे.
आठवावे रुप…हिंदूस्वरुप!, अभिमान खूप महाराष्ट्राला, असा प्रकारचा मथळा देखील या टिझरला देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवतिर्थावर राज ठाकरे नावाची तोफ कोणावर बरसणार?, याची उत्सुकता लागली आहे.
दम्यान, या टिझरमध्ये राज ठाकरे यांनी हुबेहुब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भगवी शाल पांघरलेली दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या खालच्या दर्जाच्या राजकारणावर राज ठाकरे काय नेमकी मतं मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ-
Raj Thackeray यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणासाठी मनसेचा टिझर….@RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/fGuiZ2eXor
— Abhishek karande (@Abhishekkaran16) March 31, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
Coffee Benefits: काॅफी प्या मस्त रहा! कॉफी पिणाऱ्यांना ‘या’ आजारांचा कमी धोका
Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…
“आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”
आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”