“…तेव्हाच अशा घटना होतात, मला घातपाताची शक्यता वाटते”

मुंबई | देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला (Delhi) आणलं जाणार आहे.

बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. दोघांवर दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे बिपीन रावत यांचं मूळ राज्य असणाऱ्या उत्तराखंडमध्ये राज्य सरकारनं तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र हा अपघात होता की घातपात?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन यांनी आज पुण्यात बोलताना बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी हवामानात बदल होतो किंवा एखादा पक्षी समोर आला की अशी घटना होण्याची शक्यता असते. मात्र, मला घातपाताची शक्यता वाटते, असं हेमंत महाजन म्हणालेत.

चीन सारख्या देशाने सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे का?, हे देखील आता पहावं लागेल, असंही हेमंत महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत एका सैन्यदलाच्या विमानानं राजधानी दिल्लीमध्ये आणलं जाईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे.

सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रावत यांची छोटी बहीण आणि भाऊ उपस्थित राहणार आहेत. जनरल रावत यांना दोन मुली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आम्हाला वाटत होतं की बाळासाहेब ठाकरे राऊतांचे गुरू आहेत, पण…”

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल 

CDS बिपीन रावतांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय! 

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन! 

बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; शक्तिकांत दास यांनी केली ‘ही’ घोषणा