“अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष”

सोलापूर | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीडमधील परळी मतदारसंघात एका दिवाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बिग बाॅस फ्रेम आणि हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीला आमंत्रित करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमावरून धनंजय मुंडे यांच्यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. अक्कलकोटमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचं भूमिपूजन पार पडलं. त्यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र, मंत्रीमहोद्य नाचण्याचे कार्यक्रम करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.

अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. आमचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुष्कळ आहे, अशा इशारा देखील फडणवीसांनी धनंजय मुंडेंना दिला आहे.

ज्या लसीला तुम्ही आधी नरेंद्र मोदींची लस म्हणत होता. तिच शेवटी तुम्हाला घ्यावी लागली. कारण ती भारताची लस होती. केंद्र सरकारने 100 कोटी लसीचं लसीकरण करून राहुल गांधी यांना उत्तर दिलंय, असा टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

अक्कलकोटमधील काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सध्या शेतकऱ्यांची लाईट कट केली जात आहे, अशा अहंकारी लोकांना लोकं गाडल्याशिवाय राहणार नाही, असंही फडणवीस म्हणाले. दोन वर्ष झाली तरी सरकार शेतकऱ्यांकडे पाहण्यास तयार नाही, हे वसुली सरकार आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.

एखादा सामान्य माणूस भेटला तरी सरकार त्यांच्याकडून वसुली करतंय, असं वसुली सरकार आतापर्यंत पाहिलं नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, पंढरपुरात असताना देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्लावर देखील भाष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या केसालाही धक्का बसला लागला तर आम्ही शांत बसणार नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“गोपीचंद पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर…”

सरकारी कर्मचाऱ्यांना नवं फर्मान; कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली लागू

वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी