“गोपीचंद पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर…”

सोलापूर | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवाराची पळवा पळवी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून सांगलीमध्ये रविवारी पडळकर गट आणि राष्ट्रवादी-शिवसेना गट यांच्यात तुफान हाणामारी झाल्याचं समोर आलं होतं.

सांगलीमध्ये झालेल्या या राड्यामध्ये गोपीचंद पडळकरांची गाडी देखील फोडण्यात आली होती. त्यावरून आटपाडीमध्ये तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ले होत आहेत. गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवत आहेत, असं देवेेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही गप्प बसणार नाही. राज्य सरकारने तात्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरमध्ये केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांवर काल सांगलीतील आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता. या हल्ल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत राज्य सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु राज्य सरकार भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारच्या अशा धमक्यांना वाल्यांना आम्ही घाबरणार नाहीत, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

आमच्या सरकारच्या काळात ज्यावेळी जितेंद्र आव्हाडांना धमकी आली होती. त्यावेळी आमच्या सरकारने त्यांना सुरक्षा दिली होती, अशी आठवण देखील देवेंद्र फडणवीसांनी करून दिली आहे.

आव्हाडांना धमकी आली होती, त्यावेळी शरद पवार मला म्हणाले होते.  त्यावेळी ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार न करता त्यांना सुरक्षा दिली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतलं त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तर त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना देखील खोचक टोले लगावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

सरकारी कर्मचाऱ्यांना नवं फर्मान; कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली लागू

वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा”