हाय रे गर्मी! देशातील 5 राज्यांना तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली | राज्यात आणि देशभरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे त्यातच आता भारतीय हवामान विभागाने उष्णतेमध्ये तीव्र वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

देशातील पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातही तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले आहे. बुधवारी देशातील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढलेले पाहायला मिळाले.

पुढील चार दिवसांमध्ये वायव्य भागातील तापमानात सुमारे दोन अंश सेल्सियसने वाढ होणार आहे. जरी तापमानात वाढ होत असेल तरी पुढील काही दिवसांतच तापमान 2 अंश सेल्सिअसने घटण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणा येथे उष्णतेत कमालीची वाढ होणार आहे. सदरील राज्यांच्या काही भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.

भारतीय हवामान विभागाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर विविध भागांमध्ये वरूणराजा थंडावा देण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लोकांना तीव्र उष्णता सहन करावी लागत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राजधानी दिल्लीतील तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, देशात निर्माण झालेल्या कोळसा टंचाईमुळे अनेक ठिकाणी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेचा अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार, शिवसेना व्हिडीओ बाॅम्ब फोडणार; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

“राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक, त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय”

चिंताजनक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या लक्षणानं वाढवलं टेंशन

 “महाराष्ट्रात योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी” 

  ‘शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून…’; पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल