रिलायन्स इंडस्ट्रीजची ऐतिहासिक वाटचाल; शेअर्स विक्रमी स्तरावर, देशातील पहिली कंपनी बनली

मुंबई | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात (Stock Market) अस्थिरता कायम असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, आज बाजारात सकारात्मक चित्र पहायला मिळालं.  रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये (Reliance Industries) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस राहिला.

रिलायन्स इंडस्ट्रीज 19 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवल गाठणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे. कंपनीच्या शेअर्स 1.85 टक्क्यांची वाढ होऊन 2827 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याचं पहायला मिळालं.

गुंतवणूकदारांचा सकाळ सकाळी मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळालं आहे. मार्केट बंद होताना शेअर्समध्ये 0.008 टक्क्यांची वाढ दिसत होती. विक्रमी स्तर गाठून आता रिलायन्सने ऐतिहासिक वाटचाल केली आहे.

यंदाच्या वर्षात रिलायन्सचे शेअर 19 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. त्यामुळे मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 28,051 कोटींनी वाढून 7.80 लाख कोटी रुपये झाली आहे. यंदाच्या वर्षात रिलायन्सला मोठा फायदा झाल्याचं दिसतंय.

दरम्यान, 19 लाख कोटी रुपयांचं भांडवल असणाऱ्या या कंपनी मोठी वाटचाल केल्यामुळे गुंतवणूकदारांनीत देखील त्यांचं स्वागत केलं. आता शेअर्स आणखी वाढणार की मागची वाट धरणार हे उद्या समोर येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

हाय रे गर्मी! देशातील 5 राज्यांना तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार, शिवसेना व्हिडीओ बाॅम्ब फोडणार; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

“राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक, त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय”

चिंताजनक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या लक्षणानं वाढवलं टेंशन

 “महाराष्ट्रात योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी”