अजित पवार म्हणतात, “तो राज्यपालांचा अधिकार पण ज्या परंपरा…”

सिंधुदुर्ग |  गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagsingh Koshyari) आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. विधानपरिषदेच्या 12 आमदारांवरूनही राज्यपालांनी अद्याप निर्णय दिेलेला नाही. त्यातच महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi government) राज्यपालांना विधानसभा अध्यक्षनिवडीबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे.  राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या सहीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या दुरूस्ती प्रस्तावाला भाजपकडून (BJP) विरोध दर्शविण्यात आला आहे. याकारणांमुळे राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. यावर अजित पवार यांनी आम्ही राज्यपालांकडे फाईल पाठवली आहे. काल मी दिवसभर पुणे दौऱ्यावर होतो. रात्री बारामती आणि सकाळी सिंधुदुर्गमध्ये तसेच दुपारी रत्नागिरीला असणार आहे.

संध्याकाळी मुंबईला गेल्यावर त्याची माहिती घेणार आहे. शेवटी कुठल्या फाईलवर सही करायची हा सर्वस्वी अधिकार महामहिम राज्यपालांचा असतो. लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्या परंपरांचं पालन राज्यकर्ते करतील. तसेच राज्यपालांनी केलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात माहितीस्तव कळवण्यात आले आहे. परंतु, त्यावर कोणतही उत्तर आलेलं नाही. त्याचं उत्तर नाही आलं तरी ही निवडणूक होईलं, असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.

रविवारी सिंधुदुर्ग नियोजन समिती आढावा बैठक ओरोस येथे पार पडली. त्यानिमित्ताने अजित पवार सिंधुदुर्गमध्ये उपस्थित होते.  या बैठकीसंदर्भात अजित पवारांना विचारले असता,  ‘डिसेंबर संपत आलेला आहे. जानेवारी फेब्रुवारी, मार्च हे आर्थिक वर्षातले तीनच महिने शिल्लक आहेत.

त्यामुळे मी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांना दिलेला निधी किती टक्के खर्च झाला आहे. किती टक्के बाकी आहे. शासकीय मान्यता मिळाल्या का? राहिलेले पैसे खर्च होऊ शकतील का?’ याबद्दलचा आढावा घेत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

पैसे खर्च करत असताना आमदार निधीचा पैसा, निधीतील कुठल्याही पैशाला कर लावलेला नाही. देश आणि जगामध्ये ओमियक्रॉन म्हणून एक नविन विषाणू आलेला आहे. त्याचं प्रमाण वाढत आहे. कालचं पंतप्रधानांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच 60 वर्षांच्या पुढील नागरिकांना बुस्टर डोस घेण्याच्या बद्दल त्यांनी सुतोवाच केलं आहे आणि जे फिल्डवर काम करत आहेत. त्यांच्याकरता देखील बुस्टर डोस देण्याच्या बद्दल त्यांचा निर्णय झालेला आहे. त्याबद्दल आपली तयारी व्यवस्थितपणे आहे का?, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

उद्या काही घडू नये पण घडलचं तर ऑक्सिजन निर्मितीच्या बद्दल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं की, तुम्हाला जेवढा ऑक्सिजन लागणार आहे त्याच्या तिप्पट तुमची तयारी झाली का? या सर्व अनेक बाबींचा आढावा घेण्याकरिता आज पार पडली.

महत्त्वाच्या बातम्या- 

फुटबाॅलच्या मैदानात दुर्दैवी घटना; खेळाडू गोलकिपरला धडकला अन्…; पाहा व्हिडीओ

“वडिलांनी सांगितलंच होतं, आज काहीतरी वाईट होणार”, जग्गूदादाचा मोठा खुलासा

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; तब्बल 33 जणांना कोरोनाची लागण

“असं काही घडू नये, पण घडलंच तर…”, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘मला संपवण्याचा कट होता, एक गाडी…’; पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप