Holi: होळीत केसांची घ्या खास काळजी; ‘या’ पाच ट्रिक नक्की वापरुन पाहा

मुंबई | लहानपणी होळी म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असायचा. दिवसभर रंग घेऊन गल्लोगल्ली फिरायचं आणि रात्री चवदार तूप लावलेलं पुरणपोळी खायची. अशी ही होळी…

रंगांच्या या सणावर सर्वजण भांडणे, मतभेद विसरून हा सण साजरा करतात. या सणात रंग आणि गुलालाला खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत रंगाचा सण अशी होळीची ओळख.

होळीत रासायनिक रंग आणि गुलाल वापरल्याने त्वचेसोबतच केसांवरही खूप वाईट परिणाम होतो. केसांना रंग दिल्याने केसांच्या विविध समस्या उद्भवू शकतात.

होळीपूर्वी काही पद्धतींचा अवलंब केल्यास समस्या टाळता येऊ शकतात. रंग खेळण्याच्या आधी जर काही काळजी घेतल्यास केसांच्या समस्यांपासून वाचता येऊ शकतं.

होळीसाठी केसांची काळजी घेण्यासाठी आधी केस कापून घ्या. सिंथेटिक रंग तुमचे केस कोरडे बनवू शकतात, त्यामुळे केस कमी केल्याने नंतर केसांची निगा राखण्यास मदत होते.

कंडिशनर केसांना अधिक संरक्षण देतात. त्यामुळे सुरुवातीलाच केसांना कंडिशनर करायला विसरू नका. केसांवर किमान 10 मिनिटे कंडिशनर राहू द्या. कंडिशनर केसांच्या मुळांमध्ये जाऊ नये, याची काळजी घ्या.

10 मिनिटांनी केस धुवा. त्यानंतर केस चांगले कोरडे करा. होळीच्या दिवशी सकाळी तेल लावण्यापूर्वी केस धुणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही आदल्या रात्री केस चांगले धुवू शकता.

होळी खेळण्यापूर्वी केसांना तेल लावल्याने केसांमध्ये रंग जाऊ शकत नाही आणि होळीनंतर केसांना रंग धूत असताना केस तुटत नाहीत.

दरम्यान, रंग खेळण्याआधी तुम्ही केसांना योग्य प्रकारे झाकून घेणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे केसांचं नुकसान होत नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Russia Ukraine War: “जेव्हा इतिहास लिहिला जाईल…”, रशियाने भारताला दिलेल्या ऑफरमुळे अमेरिका नाराज

फडणवीसांच्या टीकेला विधानसभेत अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

होळी-धुळवडसाठी सरकारची नवी नियमावली जारी; वाचा काय आहेत निर्बंध

“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं…”

Omicronच्या पाचव्या व्हेरियंटचा जगभर धुमाकूळ; चीनमध्ये लाॅकडाऊन तर भारताचं टेन्शन वाढलं