मोठी बातमी! शरद पवार-संजय राऊत यांच्यात 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा

नवी दिल्ली | राज्य सरकार आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार संघर्ष पेटला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची किनार या वादाला आहे.

ईडी, सीबीआय, आयकर विभाग, या केंद्रीय यंत्रणांनी गतकाही काळापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात जोरदार राजकारण तापलेलं असताना आता शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. 20 मिनिटांहून अधिक वेळ ही बैठक बंद दाराआड पार पडली.

नुकत्याच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदरी निराशा पडल्यानं ही बैठक त्यावर चर्चा करण्यासाठी होती, अशी चर्चा आहे.

ईडीच्या कारवाया, विधानसभा निकाल, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. परिणामी राज्यासह दिल्लीतही महाविकास आघाडीचे नेते खलबतं करत आहेत.

दिल्लीत संसदेच अधिवेश चालू असल्यानं राज्यातील सर्व खासदार दिल्लीत आहेत. भाजप खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक होणार आहे. तर शिवसेना खासदारांचीही बैठक होणार आहे.

सध्या देशात द काश्मीर फाईल्सवरून जोरदार राजकारण पेटलं आहे. संजय राऊत यांनी भाजपवर काश्मीर फाईल्सवरून जोरदार टीका केली आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार आणि संजय राऊत यांनी प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकीबाबत राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी वर्तवली आहे. राज्यपालांनी नुकतंच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला ब्रेक लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Russia Ukraine War: “जेव्हा इतिहास लिहिला जाईल…”, रशियाने भारताला दिलेल्या ऑफरमुळे अमेरिका नाराज

फडणवीसांच्या टीकेला विधानसभेत अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

होळी-धुळवडसाठी सरकारची नवी नियमावली जारी; वाचा काय आहेत निर्बंध

“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं…”

Omicronच्या पाचव्या व्हेरियंटचा जगभर धुमाकूळ; चीनमध्ये लाॅकडाऊन तर भारताचं टेन्शन वाढलं