नवी दिल्ली | सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) घनघोर युद्ध सुरू आहे. युक्रेनने अद्याप गुडघे टेकवले नसल्याने आता रशियाने आता संपुर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाने युद्ध थांबवावं यासाठी जगातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. अशातच आता रशिया एकाकी पडत असल्याचं पहायला मिळतंय. संकटाच्या काळात रशियाने परममित्र भारताला एक मोठी ऑफर दिली होती.
अमेरिकेनंतर आता युरोपियन युनियन देखील रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे रशियाने भारताला स्वस्त किंमतीत तेल खरेदी करण्याची ऑफर दिली होती. त्यावर आता अमेरिका नाराज असल्याचं पहायला मिळतंय.
कोणत्याही देशाला आमचा संदेश असा आहे की आम्ही जे निर्बंध लादले आहेत, आम्ही सर्वांनी शिफारस केलेल्या निर्बंधांचे पालन करतो, असं ट्विट करत अमेरिकेने म्हटलं आहे.
भारताला देण्यात आलेल्या ऑफरवर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मला वाटत नाही की ते उल्लंघन करेल, असं उत्तर दिलं आहे.
विचार करा, इतिहासाची पुस्तके या काळाबद्दल लिहिली जातात तेव्हा कुठे उभे राहायचे?, असंही व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.
रशियन नेतृत्वाला पाठिंबा म्हणजे अशा आक्रमणाला पाठिंबा आहे ज्याचे स्पष्टपणे विनाशकारी परिणाम होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, एकंदरीत अमेरिका भारतासोबत वयक्तिक संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे रशियाला मदत होत असल्याने नाराज देखील असल्याचं पहायला मिळतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
फडणवीसांच्या टीकेला विधानसभेत अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
होळी-धुळवडसाठी सरकारची नवी नियमावली जारी; वाचा काय आहेत निर्बंध
“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं…”
Omicronच्या पाचव्या व्हेरियंटचा जगभर धुमाकूळ; चीनमध्ये लाॅकडाऊन तर भारताचं टेन्शन वाढलं
संसदेत सोनिया गांधींची भाजपवर कडाडून टीका, म्हणाल्या…