ऊन-पावसाचा खेळ सुरूच! पुण्यासह राज्यातील ‘या’ 12 जिल्ह्यात पाऊस बरसणार

मुंबई | देशातील थंडी गायब होत असताना आता उन्हाच्या झळा पुन्हा बसू लागल्या आहेत. बंगालच्या उपसागरमध्ये चक्रीवादळाची (Cyclone) स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे आता भारतीय किनारपट्टी भागात मोठा धोका निर्माण झाला आहे.

या चक्रीवादळामुळे आता महाराष्ट्रातील तापमान कमी झाल्याचं पहायला मिळतंय. कोकण तसेच घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालंय.

पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या 12 जिल्ह्यात आता पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

या 12 जिल्ह्यात सकाळपासूनच आज ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मंगळवार आणि बुधवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने आता मच्छिमारांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तुम्ही ठरवलं तर माझा पहिला नंबर येतोच, 3 मार्कशीट जूळवून पहिले आले, आता…”

नवनीत राणांवर चढला पुष्पाचा फिवर! म्हणाल्या, “नवनीत नाम सुनके…”; पाहा व्हिडीओ

“…मग मोहन भागवत यांच्या नावापुढे ‘खान’ लावणार का?”

“देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”

एमआयएमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…