ठाकरे सरकारचा मोठं पाऊल, पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय गृहमंत्र्यांनी केला जाहीर

मुंबई | महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. आता पोलिसांनी जीव गमावल्यानंतरही त्यांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहता येणार आहे, अशी  घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या या भयानक संकटात राज्यातील पोलीस कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. आतापर्यंत 51 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना 65 लाख रुपयांपर्यंत मदत करण्यात येत आहे.

तसेच कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येईल, अशी माहिती गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गृहमंत्री देशमुख यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केल्यानंतर पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. तसंच या निर्णयाचं त्यांनी स्वागत देखील केलं आहे.

 

-इंदुरीकर महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, अखेर गुन्हा दाखल

-“पवारांचं वय, अनुभव पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”