तरुणांनो तयारीला लागा, पोलीस भरतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई | पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे.

राज्यभरात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते.

कोरोना काळात राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती झाली नव्हती.

पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

…अन्यथा हेल्मेट घातलं तरी भरावा लागेल ‘इतका’ दंड!

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली” 

“पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल”