Uncategorized मनोरंजन

हनी सिंगच्या पत्नीचा सासऱ्यावर धक्कादायक आरोप! म्हणाली, नशेत त्यांनी माझ्या स्तनांना…

Photo Credit: Instagram/Honry Singh

मुंबई | बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सींग गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी सिंग हिने आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पतीने आपला लैंगिक छळ करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप शालिनीने केला आहे.

शालिनीने हनी सिंगच्या कुटुंबाविरोधात 160 पानाची याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने हनी सिंगच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच या याचिकेत शालिनीने आपल्या सासऱ्यावर देखील काही गंभीर आरोप केले आहेत.

याचिकेत शालिनी म्हणाली की, माझे सासरेे एक दिवस दारुच्या नशेत माझ्या रुममध्ये आले. तेव्हा मी कपडे बदलत होते. मी अशा अवस्थेत असताना देखील ते माझ्या जवळ आले आणि माझ्या स्तनांवरून हात फिरवून गेले.

शालिनी सिंगच्या या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण सिंग कुटुंब वादाच्या घेऱ्यात सापडलं आहे. तसेच सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. हनी सिंगचे काही चाहते त्याच्या बाजूने उभे ठाकले आहेत. तर काही चाहते हनी सिंगवर शिंतोडे ओढत आहेत.

याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हनी सिंग म्हणाला की, माझ्या जवळच्या सर्व लोकांना माझे माझ्या पत्नीसोबत असलेले संबंध माहीत आहेत. यामुळे खरं काय ते मी बोलणं गरजेचं नाही. माझा कायद्यावर संपूर्ण विश्वास आहे.

दरम्यान, शालिनी सिंगने आपल्या पतीविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये काही धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. हनीमूनच्यावेळी हनी सिंगने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप शालिनीने केला आहे.

हनी सिंगला आमचं लग्न सार्वजनिक करायचं नव्हतं. मी त्याला लग्नात घातलेली अंगठी देखील त्याने काढून ठेवली होती. आम्ही ज्यावेळी हनीमूनसाठी गेलो होतो त्यावेळी तो खूप शांत राहत होता. याबद्दल मी त्याला विचारणा केली तेव्हा तो खूप चिडला आणि मला मारहाण केली, असा आरोप हनी सिंगने याचिकेत केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

कौतुकास्पद! आयसीयूमध्ये अभ्यास करत शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर

माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली ‘ही’ खंत

भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ