ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसाठी मंत्री हसन मुश्रीफांची खुशखबर

मुंबई | इथून पाठीमागील काळात ग्रामपंचायतीच्या सरपंचानाच फक्त अनुदान मिळत असायचे. परंतू आता मात्र ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनाही देखील मानधन मिळणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

पहिल्या टप्प्यात 15.72 कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासात महत्त्वाचा सहभाग देणाऱ्या उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.

काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन देता आले नव्हते. आता मानधन ऑनलाईन देण्याची कार्यप्रणाली तयार करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उपसरपंचांना एकूण 8 महिन्यांचे एकत्रित मानधन थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एकुण 15.72 कोटी रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती आहेत. त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या 24 हजार 485 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याचं काम सुरु आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-भारतीय कंपनीला डावलून चीनला कॉन्ट्र‌ॅक्ट दिले अन्….- जितेंद्र आव्हाड

-“नेहरूंचं परराष्ट्र धोरण चुकलं म्हणून टाळ्या मिळतील पण सैनिकांचं बलिदान थांबवण्याची जबाबदारी मोदींचीच”

-शहि…तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला?- संजय राऊत

-चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; भाजपच्या ‘या’ माजी नेत्याची नरेंद्र मोदींकडे मागणी

-पुणेकरांनी शिस्त मोडली; महापौरांनी ‘ही’ गोष्ट बंद करण्याची घोषणा केली!