“सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवणं हाच कोरोना नियंत्रणातील यशाचा मंत्र आहे”

मुंबई | कोरोना संसर्गापासून बचावासाठी राज्यातील जनतेने ‘मीच माझा रक्षक’ हा मंत्र अंगिकारावा, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यांनी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली.

राज्यातील एकूण कोरोना नियंत्रणाच्या कामाबाबत राजेश टोपे यांनी माहिती दिली. या काळात नागरिकांनी घाबरुन जाऊन अन्नधान्याची साठवणूक करु नये असंही आवाहन केलं. या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी अन्नधान्याचा काळाबाजार केल्यास कारवाईचाही इशारा टोेपेंनी दिला.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी जे जे आवाहन जनतेला केलं, ते ते संपूर्ण देशाने पाळलं, त्याचं पालन केलं. कारण ते जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्वयंशिस्तीने एकमेकांपासून अंतर ठेवावं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवणं हेच कोरोना नियंत्रणातील यशाचा महत्त्वाचा मंत्र आहे, असंही टोपे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

-जनता कर्फ्यू सकाळी 5 वाजेपर्यंत वाढवला गरज पडल्यास 31 मार्चपर्यंत वाढवणार!

-VVIP उपचारांसाठी कनिका कपूर घालतेय डाॅक्टरांशी हुज्जत

-देशात ‘कोरोना’चा सहावा बळी; पाटणामध्ये एकाचा मृत्यू

-जनता कर्फ्यूच्या दिवशी राजू शेट्टींनी काय केल? पहा व्हिडीओ

-खासदारांनो दिल्लीला जाऊ नका, महाराष्ट्रातच थांबा आणि सरकारी यंत्रणांना कोरोना विरोधात लढण्यास मदत करा – शरद पवार