‘ही’ तरुणी चक्क नग्नावस्थेत डोंगर सर करते! जाणून घ्या काय आहे कारण?

वॉशिंग्टन | आजच्या तरुणाईला ट्रेकिंगची फार जास्त आवड असलेली पाहायला मिळते. उंचच उंच कठीण डोंगर सर करण्यासारखं साहासाचं काम करणाऱ्यांमध्ये एक वेगळंच पॅशन असतं. अनेक तरुण तरुणी आपल्या ट्रेकिंगचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करतात आणि लोकांची वाह वाह मिळवतात.

सध्या अशाच एका फॉरेनर ट्रेकर तरुणीची खूप जास्त चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या तरुणीला नग्नावस्थेत डोंगर सर करण्याची आवड आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर न्यूड होऊन डोंगर सर करतानाचे तिचे फोटो अपलोड केले आणि सोशल मीडियावर चर्चांना एकंच उधाण आलं.

या तरुणीचं नाव जसोरका असं आहे. जसोरकाचं वय सध्या 37 वर्ष आहे. जसोरका अमेरिकेतील न्यु जर्सी येथील एका कॅसिनोमध्ये काम करते. जसोरका सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती सतत सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटोज शेअर करत असते.

एका वर्षापूर्वी जसोरकाला तिच्या एका मैत्रिणीने काही हटके फोटो काढण्याचा सल्ला दिला होता. या मैत्रिणीने जसोरकाला फोटो काढण्यासाठी अनेक वेगवेगळ्या आयडिया दिल्या होत्या. यावेळी तिने नग्न होऊन डोंगर सर करण्याचा सल्ला देखील जसोरकाला दिला होता.

नग्नावस्थेत डोंगर सर करण्याचा अनुभव जसोरकाला देखील घ्यायचा होता. या कल्पनेवर ती आपल्या कुटुंबातील लोकांशी आणि मित्रांशी बोलली. यावर त्यांनी देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत जसोरकाला प्रोत्साहन दिलं. मग एक दिवस जसोरकाने न्यूड होऊन क्लायंबिंग करण्याचं धाडस केलं.

यावर बोलताना जसोरका म्हणाली की, मी आत्तापर्यंत खूप वेळा डोंगर चढले आहे. मात्र, मी केव्हाच न्यूड होऊन डोंगर चढले नव्हते. यामुळे मी हा अनुभव घ्यायचं ठरवलं आणि तसं केलं. क्लायंबिंगचे काही फोटो मी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोचं माझ्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी खूप कौतुक केलं.

ही एक कला आहे. मी कोणतंही बेकायदेशीर काम करत नाही. मी इतर महिलांना त्यांच्या शरीराचं कौतुक करण्यासाठी प्रोत्साहित करते. तसेच फोटोशूट करण्यासाठी मी जास्तीत जास्त पुरुषांना बरोबर घेऊन जाते. कारण अशा परिस्थितीत महिलांना अवघडल्यासारखं वाटू शकतं, असंही जसोरकाने म्हटलं आहे

दरम्यान, जसोरकाचे हे फोटो खूप वेगानं व्हायरल होत आहेत. अनेक माध्यमांनी याची दखल घेतली आहे. तसेच नेटकरी जसोरकाच्या फोटोजवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

चेहऱ्या ऐवजी ‘या’ ठिकाणी मास्क लावल्यामुळे महिला होतीय सोशल मीडियावर ट्रोल

जाणून घ्या! तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे कसं…

एक नारी सब पर भारी ! महिलेनं साडीवर केले खतरनाक स्टंट, पाहा…

जंगल सफारी करताना अचानक गाडीतच शिरला सिंह अन्…, पाहा…

प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने असं काही केलं की…