चंद्रपूर | लग्न होऊन ३ महिनेही उलटले नसतील…. तोच नव्यानं संसार थाटलेल्या जोडप्यातील पत्नीनं अचानक आत्महत्या केली. बायकोची चीता जळत असतानाच नवऱ्यानेही आगीत उडी मारली. छातीत धडकी भरवणारा हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये पहायला मिळाला आहे.
चंद्रपूरातील गोंडपीपारी तालुक्यातील भंगाराम-तळोधी नावाचं छोटसं गाव. नुकतंच लग्न झालेल्या तरूणीनं आत्महत्या केल्यानं गावावर दुःखाची शोककळा पसरली. मात्र पतीनंही चितेवरील आगीत उडी मारल्यानं गाव पुरत हादरून गेलं आहे.
अंत्यसंस्काराला आलेल्या गावकऱ्यांनी त्याला आगीतून बाहेरही काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीच्या धगीत सापडल्यानं त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. या नवविवाहित तरूणाला कसंबसं वाचवण्यात यश आलं असतानाच त्यानं डोळा चुकवून शेजारील विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.
किशोर खाटीक असं नाव असलेल्या युवकाचं रुचिता चिट्टावार या १९ वर्षीय तरूणीशी नुकतंच लग्न झालं होतं. चंद्रपुरमध्ये दोघे काही दिवस राहिले. मात्र अचानक रूचिता काही दिवसांसाठी माहेरी निघून आली. एके सायंकाळी तीनं विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली.
यादरम्यान नवविवाहित तरूणी ३ महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोरं आलं आहे. दोघांनीही असं धक्कादायक पाऊल टाकण्याचा निर्णय का घेतला असावा, हे गूढ मात्र अद्याप कायम आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“तुमची अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत तर अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय”
-राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांना खुलं पत्र; पत्रात अनेक धक्कादायक आरोप
-कृषीमंत्री दादाजी भुसे यांचं शेतकऱ्यांना ‘हे’ कळकळीचं आवाहन
-मुंबईतली कोरोना स्थिती कधी नियंत्रणात येईल?, महापालिका आयुक्तांनी सांगिती तारीख!
-संजय राऊतांनी शिवसेनेचे सोडून काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले का?; विखे-पाटलांचा पलटवार