“पत्नीने सेक्सला नकार दिल्यास दुसऱ्या महिलेसोबत सेक्स करण्याचा पतीला अधिकार”

मुंबई | देशात केरळ असं राज्य आहे, जिथं पुरुषांना महिलांचा सेक्सविषयी नकार हा नकारच असल्याचं समजतं. भारत सरकारच्या कौटुंबिक सर्वेक्षण अहवालात ही बाब समोर आली आहे.

केरळमधील महिलांपेक्षा अधिक पुरुषांना असे वाटते की, लैंगिक संबंधादरम्यान महिलांची संमती अधिक महत्त्वाची आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे रिपोर्ट 2019-20 नुसार, केरळमधील 75 टक्के पुरुषांचा असा विश्वास आहे की, जर स्त्रीचा मूड नसेल, ती थकली असेल, तिचा नवऱ्यावर विश्वास नसेल किंवा पतीला लैंगिक आजार असतील तर पत्नीला सेक्ससाठी नाही म्हणण्याचा अधिकार आहे.

या बाबतीत 72 टक्के महिलांना असं वाटतं की पत्नीने सेक्स करण्यास नकार देणं योग्य आहे. TOI च्या केरळमधील महिलांपेक्षा अधिक पुरुषांना असं वाटतं की, लैंगिक संबंधादरम्यान महिलांची संमती अधिक महत्त्वाची आहे.

चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालण्याचं काम करण्यात महिलाही मागे नसल्याचे अहवालातून दिसून येते. 13.1 टक्के विवाहित महिला आजही पतीने पत्नीला सेक्स करण्यास नकार दिल्याने मारहाण करणं योग्य मानतात.

तर फक्त 10.4 टक्के पुरुष याविषयी आपल्या पत्नीला मारहाण करणं न्याय मानतात. या विषयी फक्त 8.1 टक्के अविवाहित मुली अशा होत्या ज्यांनी लैंगिक संबंधास नकार दिल्याबद्दल आपल्या पत्नीला मारहाण करण्याचं समर्थन केलंय.

पत्नी लैंगिक संबंधास नकार देत असेल तर तिला मारहाण करणं योग्य नाही असं पुरुषांचं म्हणणं असले तरी अनैतिक बाबींसाठी ते आघाडीवर असतात.

सर्वेक्षणानुसार 31 टक्के पुरुषांनी सांगितलं की, जर पत्नीने सेक्सला नकार दिला तर त्याला दुसऱ्या महिलेसोबत सेक्स करण्याचा अधिकार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा भाजपच्या त्या ’12’ आमदारांना जोरका झटका 

अँटालिया प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले,’…हे मी आधीच सांगितलं होतं’ 

महाविकास आघाडीचं सरकार पडेल का?, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट

MLC Election | देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले