पहिल्याच नजरेत पडाल प्रेमात; Hyundai ची शानदार कार लवकरच येणार बाजारात

नवी दिल्ली | Hyundai Motors’ Creta भारतातील रस्त्यांवर धमाल करत आहे. भारतातील वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, अनेक कंपन्या त्यांचे लोकप्रिय ब्रँड अपग्रेड करत आहेत आणि ते पुन्हा लॉन्च करत आहेत.

Hyundai Motors India देखील त्यांच्या अनेक लोकप्रिय कार अपडेट करत आहे. Hyundai ची सर्वात स्वस्त आणि सर्वात लहान SUV व्हेन्यू भारतीय ग्राहकांना चांगलीच आवडली आहे आणि आता कंपनीने त्याच्या फेसलिफ्ट मॉडेलची चाचणी सुरू केली आहे.

Hyundai Motors लवकरच त्यांच्या मध्यम आकाराच्या SUV व्हेन्यूची फेसलिफ्ट लॉन्च करू शकते.

असं सांगितलं जात आहे की क्रेटा फेसलिस्ट देखील व्हेन्यूसह लॉन्च केली जाऊ शकते.

डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास कारला पुन्हा डिझाइन केलेलं ग्रिल मिळेल, जे अपडेटेड क्रेटा आणि नवीन टक्सनसारखं असेल.

कारला नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळतील, जे तिचा लूक सुधारणार आहेत, तर मागील बाजूस नवीन स्प्लिट एलईडी टेललॅम्पसह Ioniq5 सारखे त्रिकोणी घटक मिळू शकतात.

कारच्या केबिनमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळेल. याशिवाय कंपनी कारला नवीन कलर इंटीरियर आणि फ्रेश लुकिंग अपहोल्स्ट्री देऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या- 

काँग्रेसला सर्वात मोठा झटका, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई! 

“देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का?” 

“संसार उभारण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही” 

 राज ठाकरेंचा मनसेसैनिकांना नवा आदेश, म्हणाले…