‘मला पण गुवाहाटीला फिरायला न्यायचं हं’, चिमकुलीचा थेट मुख्यमंत्र्यांकडे हट्ट; पाहा व्हिडीओ

मुंबई | एकनाथ शिंदेंसह 40 समर्थक आमदारांनी बंड करत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी सुरत, गुवाहाटी, गोवा दौरा करत राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार पाडलं.

शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदार व स्वत: एकनाथ शिंदे गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. याच हॉटेलमध्ये मुक्काम ठोकत बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीचं सरकार हदरवून सोडलं.

10 दिवसांच्या राजकीय नाट्यावर पडदा पडला व अखेर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आपला हट्ट पुरवण्यासाठी एका चिमुकलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच प्रॉमिस मागितलं आहे.

सुट्टीत मला फिरायला गुवाहाटीला घेऊन जायचं, असं प्रॉमिस या चिमुकलीने एकनाथ शिंदेंकडे मागितलं आहे. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर गुवाहाटीचं प्रस्थ वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

अन्नदा डावरे नावाची ही चिमुकली आपल्यालाही गुवाहाटीला घेऊन जा, अशी मागणी एकनाथ शिंदेंकडे करत आहे. या चिमुकलीने रविवारी एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर त्यांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांशी बोलताना आता दिवाळीच्या सुट्टीत मला गुवाहाटीला न्यायचं हं.. प्रॉमिस?… असं अन्नदा मुख्यमंत्र्यांना म्हणाली. यानंतर उपस्थितांसह मुख्यमंत्रीही हसू लागले.

दरम्यान, चिमुकलीच्या गोड मागणीवर मुख्यमंत्र्यांनाही हो म्हणण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

….अन् किशोरी पेडणेकरांंनी ते प्रेमपत्रच खाल्लं, पेडणेकरांच्या प्रेमकहाणीतील भन्नाट किस्सा

“शरद पवारांची राजकीय जीवनातील 60 टक्के वर्ष विरोधी बाकावर गेली”

‘मी स्वत:लाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो’, एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर आमदाराचं मोठं वक्तव्य

“संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त वर्तमानपत्र चालवावं”