‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

मुंबई | आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी व बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन त्यांच्या नात्याच्या कबूलीमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

ललित मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांचे व सुष्मिताचे काही फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची कबूली दिली. त्यानंतर तर जणू सोशल मीडियावर चर्चासत्र रंगलं.

ललित मोदींवरील मनी लाँड्रिंगचे आरोप, सुष्मिता सेनचे यापूर्वीचे अफेअर्स ते अगदी सुष्मिता सेन व ललित मोदींची संपत्ती या सगळ्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. यासर्वात अनेक नेटकऱ्यांनी सुष्मिताचा गोल्ड डिगर असा उल्लेख करत तिला ट्रोल केलं होतं.

ललित मोदी सोबतच्या रिलेशनमुळे गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांना सुष्मिताने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिताने पोस्ट शेअर करत झापलं असून तिच्या आनंदात सहभागी होणाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत.

गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांना मी एवढंच सांगेन की मी सोन्याहून खोल विचार करते आणि मी नेहमीच हिऱ्यांना प्राधान्य दिलं आहे. आणि हो ते अजूनही मी स्वत:च विकत घेते, असं म्हणत सुष्मिताने ट्रोलर्सना झापलं आहे.

मी कधीच ग्लॅमर आणि टाळ्यांच्या क्षणीक उधारीवर जगले नाही. मी मध्यस्थ असणारी आणि स्वत:मध्ये हरवलेली स्त्री आहे. मी एक तळपता सुर्य आहे, असंही सुष्मिता सेन म्हणाली आहे.

दरम्यान, माझ्या शुभचिंतकांचे मनापासून असणारे समर्थन मला भावते, असं म्हणत सुष्मिताने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तर तुमची सुश अगदी व्यवस्थित आहे, असंही सुष्मिता तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

महत्त्वाच्या बातम्या-

….अन् किशोरी पेडणेकरांंनी ते प्रेमपत्रच खाल्लं, पेडणेकरांच्या प्रेमकहाणीतील भन्नाट किस्सा

“शरद पवारांची राजकीय जीवनातील 60 टक्के वर्ष विरोधी बाकावर गेली”

‘मी स्वत:लाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समजतो’, एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर आमदाराचं मोठं वक्तव्य

“संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त वर्तमानपत्र चालवावं”

‘चार गाढवं एकत्र चरत असली तरी हुकुमशहाला भिती वाटते’, शिवसेनेचा हल्लाबोल