TET PAPER SCAM! “मला फसवण्यात येत आहे”; तुकाराम सुपेंचा धक्कादायक खुलासा

मुंबई | देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील एक मोठा घोटाळा म्हणून व्यापम घोटाळ्याला ओळखण्यात येतं. अगदी त्याच धर्तीवर राज्यात पदभरतीत घोटाला झाल्याचं सध्या समोर येत आहे.

राज्य परीक्षा परिषदेचा निलंबीत अध्यक्ष तुकाराम सुपेंची सध्या पुणे सायबर विभागाकडून जोरदार चौकशी सुरू आहे. दररोज या प्रकरणात नवीन खुलासा होत आहे. परिणामी आता या प्रकरणानं मोठं स्वरूप घेतलं आहे.

तुकाराम सुपे पदावर असताना टीईटी 2018 आणि 2019 परीक्षेत घोटाळा करण्यात आल्याचं आता उघड झालं आहे. सुपेंकडून आतापर्यंत जवळपास 4 कोटीच्या घरात रक्कम जप्त करण्यात आली आहे.

चौकशी दरम्यान सुपे अनेक खुलासे करत आहे. त्यातच आता सुपेच्या एका खुलाशानंतर राज्यात खळबळ माजली आहे. टीईटी परीक्षा प्रकरणी मला बळीचा बकरा बनवण्यात येतं आहे, असं सुपेनं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं आहे.

मी काहीच केलं नाही मला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे. मला जाणुनबुजुन त्रास देण्यात येत आहे. मला या सर्वांचा त्रास आता सहन होत नाही. परिणामी मला आत्महत्या करावी वाटत असल्याचं वक्तव्य सुपेनं केल आहे.

तुकाराम सुपेचे वकील अॅड. मिलींद पवार यांनी तुकाराम सुपेनं जे सांगितलं त्याबद्दल माहिती दिली आहे. 2017 मध्ये ज्या कंपन्यांना परीक्षेची कामं देण्यात आली होती त्यांनाच आपल्या काळात दिली गेली, असं सुपेचं म्हणणं आहे.

सध्या पुण्याचे पोलीस अयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपास  चालू आहे. गरज पडल्यास सुपेच्या घरच्यांनाही आरोप करण्यास पोलीस तयारी करत आहेत, अशी माहिती सुपेच्या वकीलांनी दिली आहे.

टीईटी परीक्षेचा घोटाळा उघड झाल्यापासून सुपे तणावात असल्याची माहिती त्याच्या वकीलांनी दिली आहे. परिणामी सुपेच्या बोलण्यावरून टीईटी परीक्षेचे धागेदोरे किती लांबणार याची सध्या चर्चा आहे.

दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा परीक्षेतील घोटाळा उघड करण्यासाठी पोलिस कारवाई सुरू केली होती. पण टीईटी घोटाळा उघड झाल्यानं आता राज्यात सलग तीन विविध परीक्षांच्या व्यवहाराचा तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 
‘राज्यात तिसरी लाट ही ओमिक्राॅनची असेल’; राजेश टोपेंनी व्यक्त केली भिती

 मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका” 

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर