‘त्यावेळी तर मी सेवेतही नव्हतो’; नवाब मलिकांच्या आरोपांवर वानखेडेंचं प्रत्युत्तर

मुंबई | राज्यासह देशात सध्या मुंबईतील एनसीबीची कारवाई गाजत आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

2 ऑक्टोबरला मंबईतील क्रुझवरची आर्यन खानवरील कारवाई बोगस आसल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. तेव्हापासून आर्यन खान प्रकरणानं अनेक नवीन वळणं घेतली आहेत.

समीर वानखेडे यांचे ड्रग्ज पेडलरसोबत आणि ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा आरोप  मलिक यांनी केला होता. या सर्व आरोपांना वानखेडे यांनी फेटाळून लावले होते.

समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर सुद्धा मलिक यांनी आक्षेप घेतल्यानं या प्रकरणाला वैयक्तीक हितसंबंधाचं वळण लागल्याची चर्चा राज्यभर जोरात रंगली होती. अशातच आता मलिक यांच्या नव्या आरोपांनी राज्यात खळबळ माजली आहे.

समीर वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ड्रग्ज व्यवसायात आहे का?, असं म्हणत समीर वानखेडे यांच्या मेहुणीवर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. सोबतच ट्विटरवर पुरावे शेअर केले होते.

नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. मी जेव्हा एनसीबीत दाखल झालो त्याआधीचं हे प्रकरण असल्याचं वानखेडे म्हणाले आहेत.

हर्षदा रेडकर यांच्याविरूद्ध पुण्यात 2008 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा मी एनसीबीच्या सेवेत सुद्धा नव्हतो. मी आणि क्रांती रेडकर यांनी 2017 साली लग्न केल्याचंही वानखेडे म्हणाले आहेत.

माझा हर्षदा रेडकर यांच्या ड्रग्ज प्रकरणाशी काहीही संबंध नाही. उगाच मला या प्रकरणात गोवण्यात येत आहे, असं समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे.

दरम्यान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

क्रांती रेडकर यांच्यानंतर आता हर्षदा रेडकर यांचं नाव आल्यानं समीर वानखेडे आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा” 

येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

  25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल!