नवी दिल्ली | देशावरील कोरोना संकट आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या दीड वर्षापासून आपण हाताला सॅनिटायझर, नाकावर मास्क, सुरक्षित अंतर या गोष्टींचं पालन करत होतो. परिणामी सरकारी कार्यालयांमध्ये काही गोष्टींवर बंधन लावली गेली होती.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात येणार आहे. 8 नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक पद्धतीला पुन्हा सुरूवात होणार आहे. परिणामी आता सर्वांना हजेरी सक्तीची असेल.
आपापली उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमॅट्रीक हजेरी प्रणालीची पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दिवसभर आपल्या कार्यालयात उपस्थित रहावं लागणार आहे.
केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांनी पालन करणं बंधनकारक आहे. परिणामी आता गेल्या दीड वर्षापासून बंद असणारी पद्धत पुन्हा सुरू होत आहे.
कोरोनाच्या काळात सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना काही सवलती देण्यात आल्या होत्या. पण परिस्थिती थोडी सुधारताच या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत.
सरकारी कार्यालयांना नवीन नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. बायोमेट्रीक मशिनच्या बाजूला सॅनिटायझर असणं बंधनकारक असणार आहे. कर्मचाऱ्यांनी हजेरीपुर्वी आणि हजेरीनंतर हात स्वच्छ धुवणे गरजेचे आहे.
बायोमट्रीक नोंदवताना कर्मचाऱ्यांनी एकमेकांमध्ये 6 फुट अंतर राखणे गरजेचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना नेहमी मास्क घालणे बंधनकारक आहे. या अटींसह कर्मचारी कार्यालयात वावरू शकतात.
बायोमशीनची चॅटपॅड वेळोवेळी साफ करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करणे सुद्धा गरजेचे आहे. या व इतर कोरोना विषयक सर्व नियमांचं कार्यालयांमध्ये अत्यंत काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारनं कोरोना महामारीच्या पाश्वभूमिवर सर्व कार्यालयांमध्ये कमीतकमी कर्मचारी ठेवण्याचे आदेश गतवर्षी दिले होते. आता या सर्व कर्मचाऱ्यांना नियमीत कार्यालयात यावे लागणार आहे.
कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. पण आता सरकारनं कर्मचाऱ्यांना नियमित कामावर हजर राहण्याचं आदेश दिल्यानं गतवर्षीपासून प्रलंबित असणारी कामं सुद्धा आता वेगानं होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ
महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी
“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा”
येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा